Call Us : 7378378989
Mail Us : contact@sadgurusevapratishthan.org

PROJECTS

'One Book....One smile!


दिवसेंदिवस महाकाय वाढत चाललेल्यापुणे शहरात सिमेंटच्या जंगलाचा जसा जसा विस्तार होत आहे,विकासाचा आलेख वाढत जात आहे तसा तसा या शहरात काही भाग अजूनही शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या दुर्लक्षितच राहिला आहे. महाकाय वाढणाऱ्या इमारती, महाकाय वाढणारी लोकसंख्या यातच पोटाची खळगी भरण्यासाठी परप्रांतातुन आलेले मजूरवर्ग यांचा निवासाचा प्रश्न व इतर मूलभूत समस्या निर्माण होत आहेत.अतिशय दाटीवाटीची पत्र्याची घरे,रस्त्यावरच सांडपाणी व्यवस्था असलेल्या गटारी, अरुंद रस्ता असलेल्या या वस्तीत आज मराठी भाषा वाचता न येणाऱ्या,गणिती आकडेमोड न जमणाऱ्या विद्यार्थ्यांना 'वन बुक..वन स्माईल' उपक्रम(मोफत उजळणी पुस्तके प्रदान) कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

महर्षी कर्वे सोशल इन्स्टिटय़ूटच्या समाजविकास शाखेच्या विद्यार्थ्यांनी वकाही आयटी क्षेत्रातील युवकांनी मिळून 'न्यास'(नित्य:युथ असोसिएशन फॉर अवेकनिंग ऑफ सेल्फ अँड सोसायटी) संस्था स्थापन केली आहे.ही संस्था कर्वेनगर परीसरात संभानगरवस्ती,शाहुनगरवस्ती परिसरता दोन अभ्यासिका चालवते.रोहित येलीगर, तृप्ती पानसरे,ऋतुजा पायगुडे, श्रद्धा कदम व त्यांची टीम या वस्तीत झोपडीवजा भाड्याच्या घरात दोन सत्रात ही अभ्यासिका चालवतात.लहान गट व मोठा गट अशा दोन सत्रात चालणाऱ्या अभ्यासिकेत आज रोजी १०० पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. आणि कुठलेही मानधन न घेता स्वयंसेवी तत्वावर पॉकेटमनीतुन ही शाळा चालवत आहेत.

काही दिवसांपूर्वी या टीमने युवकमित्र परिवाराकडे कार्याची माहिती सोपवली होती व तत्काळ युवकमित्र परिवाराने आवश्यक मदत करण्याचे आश्वासन दिले होते.त्यानुसार आज या वस्तीत जाऊन १०० विद्यार्थ्यांना विविध उजळणी व बालवाचनाची पुस्तके भेट देण्यात आली.याच वस्तीत शिक्षण घेणाऱ्या कु.ऋतुजा व रोहित यांचा वाढदिवसही टीमने साजरा केला व एक वेगळा आनंद या बालकांना दिला,मिळवला.सोशल डिस्टनसिंग व नियमांचे पालन करत सद्गुरू सेवा फाउंडेशनचे इंजि. सचिन म्हसे,प्रवीण महाजन यांनी कार्यक्रम यशस्वी घडवून आणला.कार्यक्रमासाठी 'न्यास' संस्थेचे अध्यक्ष रोहित येलीगर,तृप्ती पानसरे, ऋतुजा पायगुडे,श्रद्धा कदम यांचे सहकार्य लाभले.जमलेल्या बच्चे कंपनीला चॉकलेट देत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.




‘जागतिक महिला दिन ’ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृतिदिवसानिमित्त कष्टकरी महिला सन्मान सोहळा व साडीभेट उपक्रम...'


सद्गुरू सेवा प्रतिष्ठान,पुणे, युवकमित्र परिवार नंदूरबार व झुंजार फाउंडेशन,कमरावद ता.शहादा जि.नंदूरबार यांच्यातर्फ आयोजित या छोटेखानी कार्यक्रमात ऊसतोड कामगार महिलांना साडी भेट देऊन सन्मान करण्यात आला. प्रसंगी युवकमित्र परिवाराचे प्रवीण महाजन, झुंजार फौंडेशनचे संस्थापक कृष्णा कोळी, पत्रकार विजय पाटील, विजय निकम, कैलास सोनवणे व कष्टकरी महिला उपस्थित होत्या. साड्या उपलब्ध करून देणेकामी पुणे येथील सद्गुरू सेवा प्रतिष्ठानचे इंजि.सचिन म्हसे यांचे सहकार्य लाभले.

  • युवकमित्र परिवार नंदूरबार/पुणे
  • झुंजार फौंडेशन, कमरावद ता.शहादा
  • सद्गुरु सेवा प्रतिष्ठान,वारजे,पुणे



'गाव तेथे ग्रंथालय'


आर्वी गाव, ता.हवेली, जि.पुणे- आम्हा युवकांचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज जयंती आज शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत,सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी आर्वी गावात साजरी करण्यात आली.

आपल्या सद्गुरू सेवा प्रतिष्ठान पुणे आणि जयआंबेमाता स्वयंरोजगार संस्था,पुणे यांच्यामार्फत गावातील वृद्ध,ज्येष्ठ नागरिकांना स्वेटर वाटप करण्यात आले तर गरीब व गरजू महिलांना साड्या वाटप करण्यात आल्या.

तसेच सद्गुरू सेवा प्रतिष्ठान,वारजे,पुणे तर्फे 'गाव तेथे ग्रंथालय' उपक्रमातर्गत आर्वी गावात वाचनालय स्थापन करत तब्बल 150 पुस्तके गावाला भेट देण्यात आली. यावेळी जय अंबेमाता स्वयरोजगार संस्था पुणेच्या अध्यक्षा मा.मंगलाताई नागुल, सद्गुरू सेवा प्रतिष्ठान,पुणे चे संस्थापक श्री.सचिन म्हसे सर, गावचे सरपंच श्री. चेतन जाधव, उपसरपंचं श्री.सागर घोगरे यांच्यासह गावातील प्रतिष्टीत महिला, नागरिक, जि.प.शाळेचे शिक्षकवृद, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




'बामखेडा (शहादातालुका, नंदुरबार) परिसरातील गरीब महिलांना साडी भेट उपक्रम..'


'सद्गुरू सेवा प्रतिष्ठान,पुणे (वारजे)' व 'युवकमित्र परिवार, नंदुरबार' यांचा संयुक्त उपक्रम...तब्बल ५५ महिलांना सारंगखेडा पो.स्टे. चे पोलीस निरीक्षक मा.राजेश शिरसाठ साहेब, 'उद्यमशील बहुउद्देशिय सेवाभावी संस्था' अध्यक्ष श्री सुशील गव्हाणे व टीम मार्फत साडी-चोळी वाटप उत्साहात संपन्न...

- घडलेली सेवा सद्गुरू चरणी अर्पण
- जय सद्गुरू



'उजळूयादी पशिक्षणाचा..पसरेल प्रकाश ज्ञानाचा!'

'आजचा प्रजसत्ताकदिन- झांबरेवस्ती, बिबवेवाडी, पुणे...'


ज्या वस्तीत अजूनही शिक्षणाची गंगा पोहचली नाही, जिथे असंख्य बाप दिवसभर व्यसन करतात...जिथं आठरविश्व दारिद्र्य आहे.अशा वस्तीत आजचा प्रजासत्ताक दिन उत्साहात पार पडला.

'आम्हाला भाई व्हायचंयं.!' काही दिवसांपूर्वी अशी उत्तरं देणारी ही निरागस बालकं सुंदर डान्स करू शकतात, फाडफाड इंग्रजी बोलू शकतात,आपले सुप्त कलागुण जाहीर दाखवू शकतात...यावर कदाचित विश्वास बसणार नाही...

आपल्या "सदगुरू सेवा प्रतिष्ठान,वारजे,पुणे" मार्फत या शाळेत 'बालवाचनालय' स्थापन करण्यात आले. लिंबू चमचा, धावण्याची स्पर्धा,डान्स स्पर्धा अशा एकूण ५ स्पर्धांमध्ये तब्बल २० पारितोषिके जिंकलेल्या ह्या बालकांना परितोषिक वितरण करण्यात आले.

सतत कुठल्या कुठल्या गुन्ह्यात चर्चेत असणाऱ्या या वस्तीत कुठलीच एनजीओ काम करायला धजावत नाही.मात्र सूर्योदय सोशल फौंडेशनच्या संस्थापिका मा.रोहिणीताई दीक्षित,मा.कोमलजी पवार यांच्या अथक परिश्रमातून आज ही संस्था या वस्तीत विधायक कार्य करू शकते.

activities.php

मी आजवर अनेक शाळांवर हिंडलो....पण आजची गरीब वस्तीतलीशाळा अन या शाळेतले गोड, विद्यार्थी, त्यांच्यातले सुप्त कलागुण पाहून प्रभावित झालो..

थोडक्यात आजचा दिवस चांगला सार्थकी झाला!

धन्यवाद!!!

जय सद्गुरू




राष्ट्रीय जल आयोग- डिस्ट्रिक्ट लेव्हल 'कॅच द रेन प्रोग्रॅम'- नेहरू युवा केंद्र नंदूरबार संलग्न युवकमित्र परिवारमार्फत यशस्वी संपन्न...


केंद्रिय जलशक्ती मंत्रालयामार्फत 22 मार्च राष्ट्रीय जलदिनानिमित्त 'कॅच द रेन प्रोग्रॅम' जलसाक्षरता अभियान साजरे केले जात आहे.या धर्तीवर नेहरू युवा केंद्र भारत सरकार संलग्न युवकमित्र परिवार मार्फत 'डिस्ट्रिक्ट लेव्हल कॅच द रेन प्रोग्रॅम' यशस्वी साजरा करण्यात आला.यावेळी जमलेल्या विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्व,पाणी बचतीची गरज,रेन वाटर हार्वेस्टिंग या विषयावर महत्व पटवून देण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.मधुकर कदम,इंजि.नरेंद्र उमाळे,अमर चव्हाण, रजनीकांत मेढे,सचिन म्हसे,यांच्यासह प्रवीण महाजन,रोहित येल्लीगर,प्रिंतेश पितळे,श्रद्धा कदम,तृप्ती पानसरे हे यांनी 'पाणी' या विषयावर विविध विचार मांडले.विविध पोष्टर प्रदर्शनातून पाणी बचतीचा संदेश यावेळी देण्यात आला.नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक अर्श कौशिक यांचे सहकार्य लाभले.

- युवकमित्र परिवार नंदूरबार/पुणे
Yuvak Mitra



ड्रीम स्पर्धा परीक्षा लायब्ररीसंपन्न...


नगावं जि.धुळे येथे "ड्रीम स्पर्धा परीक्षा लायब्ररी" चें उदघाटन....मा.अविनाश निमसे सर यांनी तब्बल 78 पुस्तके भेट दिले....धन्यवाद सर्व टीम दै. सकाळ 'यिन' व युवकमित्र परिवार.....खास ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थिनींसाठी स्थापन झालेले हे धुळे जिल्हयातील एकमेव वाचनालय आहे.युवकमित्र परिवारातंर्गत असलेल्या गाव तेथे ग्र ंथय उपक्रमातंर्गत एक असलेला हा उपक्रम आज एक यशस्वी व नाविन्यपूर्ण उपक्रम ठरला..! घडलेली सेवा सद्गुरू चरणी अर्पण.

- जय सद्गुरु
- सद्गुरू सेवा प्रतिष्ठान, वारजे, पुणे



कै तुकाराम पाटील आनंदे सार्वजनिक वाचनालय.


जागतिक बाल पुस्तक दिवस" आणि "भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त" 'गाव तेथे वाचनालय' या उपक्रमांतर्गत 'कै तुकाराम पाटील आनंदे सार्वजनिक वाचनालय' मु मासेगाव, पोस्ट कंडारी, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना येथे वाचनालयाला ११० पुस्तके प्रदान केली

मराठी भाषेचे संवर्धन व्हावे, वाचन चळवळ वृद्धिंगत व्हावी, जास्तीत जास्त विद्यार्थी उद्याचे संस्कारी नागरिक व्हावेत यासाठी वाचनालय स्थापना केल्याचे यावेळी वाचनालयाचे संचालक शिवाजी आनंदे यांनी सांगितले.

करोना काळात दक्षता म्हणून विद्यार्थ्यांना न बोलावता केवळ वाचनालयातील सर्व कार्यकारी मंडळ एकत्र येउन शासनाच्या नियमांचे पालन करत हा कार्यक्रम पार पडला

घडलेली सेवा सद्गुरू चरणी अर्पण

- जय सद्गुरु
- सद्गुरू सेवा प्रतिष्ठान, वारजे, पुणे